उल्हासनगर, उल्हासनगरचे जेष्ठ पत्रकार आणि समाजसेवक रामेश्वर गवई यांची 24 वर्षीय मुलगी प्रणाली गवई हिचे कावीळच्या आजाराने आकस्मिक निधन झाले, इंजिनियरिंग मध्ये पदवीधर असलेल्या प्रणालीवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यात येत होते , या रुग्णालयात कोरोना टेस्टच्या नावाखाली सुमारे 1 तास 45 मिनिटे बसविण्यात आले , मात्र तोपर्यंत तिची तब्येत बिघडल्याने माझ्या मुलीला जीव गमवावा लागला असा आरोप रामेश्वर गवई यांनी केला आहे . प्रणाली गवई हीने आय टी विषयात इंजिनियरिंग केले होते , लहानपणा पासूनच अत्यंत हुशार असलेली प्रणाली ही यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेची तयारी करीत होती, सामाजिक क्षेत्रात ती वडीलांप्रमाणेच अग्रेसर होती, 7 एप्रिल 2020 रोजी तिला टायफॉईड झाला होता, तिच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यात आले होते , तिचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले होते , 20 एप्रिल 2020 ला अचानक प्रणालीची तब्येत खराब झाली तेव्हा तिला मध्यवर्ती रुग्णालयात तपासणी दुपारी 12 वाजताच्या सुमारास रामेश्वर गवई , शिवाजी रगडे आणि अन्य सहकाऱ्यांनी आणले , यावे...